अन्न हे पूर्णब्रह्म !!
पोट शांत तर शरीर नीट. आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये सर्वाधिक आढळणारा आणि ज्याच्या शिवाय जेवण पूर्ण होत नाही असा अन्नपदार्थ म्हणजे भात. भाताचे अनेक प्रकार आपण सर्रास जेवणामध्ये वापरतो. साधा भात, गोड भात, राईस, पुलाव, व्हेज पुलाव, खिचडी, दाल चावल असे एक ना अनेक खाद्यपदार्थ आपण तांदळाच्या वापराने करू शकतो. तांदळापासून बनवलेले हे सगळे अन्नपदार्थ अत्यंत चविष्ट आणि पोट भरण्यास उपयुक्त असे आहेत. पण जर तुम्हाला आम्ही असं सांगितलं की स्वस्त तांदूळ किंवा हलक्या प्रतीचा तांदूळ खाल्ल्याने तुमच्या शरीराला कॅन्सर सारख्या भयंकर रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा संभव आहे तर कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही. थांबा थांबा, घाबरून जाऊ नका, आम्ही काय सांगतोय ते नीट ऐका आणि योग्य प्रकारचे तांदूळ निवडून पोषक असे जेवण घ्या.
मित्रांनो आजकाल ज्या प्रकारे शेतामध्ये पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, त्याचे विपरीत परिणाम अन्नपदार्थांवर होताना दिसून येत आहेत. त्यामुळे तांदळाची गुणवत्ता खराब होऊन त्यावर केलेल्या रासायनिक खतांचा विपरीत परिणाम म्हणून शरीराला कॅन्सर सारख्या रोगाचा धोका उद्भवू शकतो. औद्योगिक विषारी पदार्थ आणि कीटकनाशक यामुळे जमिनीचा पोत तर खराब होत आहेच, याशिवाय अन्नपदार्थांची गुणवत्ता सुद्धा खालावत आहे. तांदळाच्या गुणवत्तेचा अभ्यास केल्यानंतर शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, आर्सेनिक रसायनाचा वापर औद्योगिक कीटकनाशके तयार करण्यासाठी केला जातो, ही कीटकनाशके बराच काळ जमिनीत राहतात त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम अन्नावर होताना दिसून येत आहे.
त्यामुळे असा तांदूळ शरीरात कॅन्सरच्या समस्यांना उत्तेजन देणाऱ्या कर्सिनोजेन्सचे कारण ठरू शकतो. कर्सिनोजेन असा घटक आहे ज्यामुळे माणसांमध्ये कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.
इंग्लंडच्या संशोधकांनी त्यांच्या अलीकडच्या संशोधनात असे सांगितले की, जर तुम्ही तांदूळ व्यवस्थित शिजवल्याशिवाय आणि धुतल्याशिवाय खात असाल तर तुम्ही कॅन्सर सारख्या गंभीर आजारांना आमंत्रण देत आहात.
एका अभ्यासा दरम्यान शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये तांदूळ खाण्याचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे त्यांच्यात कॅन्सरचा धोका जास्त असतो. त्यामुळे स्त्रियांमध्ये विशेषतः स्तन आणि फुफुसाच्या कॅन्सरचे प्रमाण जास्त आढळून येते.
हे सगळं ऐकून भात खाणं सोडून देऊया असा विचार करत असाल तर जरा थांबा, इतका टोकाचा निर्णय घेण्याची गरज नाही. पण भात करत असताना काही साध्या, सोप्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर कॅन्सरचा धोका आपण शंभर टक्के टाळू शकतो.
त्यासाठी खिचडी, भात करण्याआधी तांदूळ काही वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि त्यानंतर पाणी फेकून द्या. असे केल्याने तांदळामधील विषाचे प्रमाण 80% पर्यंत कमी होते आणि त्यानंतर भात व्यवस्थित शिजवला की मग हे प्रमाण अजून कमी होऊन भात पोषक बनतो.
भारतात सगळीकडे पांढरा तांदूळ वापरला जातो. त्यात पॉलिश केलेल्या तांदळाचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे. पॉलिश केलेले तांदूळ जास्त प्रमाणात खाल्ल्याने धोका निर्माण होतो. त्यामुळे साधे, पॉलिश न केलेले तांदूळ खाणे जास्त हितकारक ठरते.
तांदूळ घेताना चांगल्या प्रतीचा, वासाचा घ्या. स्वस्तातील तांदूळ घेऊ नका.
काळा तांदूळ आपल्याकडे फारसा प्रचलित नाही, हे प्रमाण जवळपास शून्य आहे. पण पांढऱ्या तांदळाच्या तुलनेमध्ये काळा तांदूळ जास्त फायदेशीर आणि आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असल्याचे दिसून येते. त्यामुळे काळ्या तांदळाचा आहारात वापर करता आला तर कॅन्सरचा धोका उद्भवणार नाही. आणि हो, आज प्लॅस्टिक चायनीज तांदूळ भेसळ करण्यासाठी वापरला जात आहे ज्याचा विचार केला पाहिजे.