काळी हळद खरंच काळी असते? | Is black turmeric really black?

काळी हळद खरंच काळी असते? | Is black turmeric really black?

Is black turmeric really black?: मित्रांनो किचनमध्ये वापरले जाणारे बहुतांश मसाले हे बहुगुणी स्वरूपाचे असतात. काळी मिरी, लवंग,ओवा, विलायची या मसाल्यांचा वापर फक्त खाद्यपदार्थात न होता अनेक आजार बरे करण्यासाठी केला जातो. म्हणूनच यांना आजीबाईचा बटवा असेही म्हटले जाते. या मसाल्यांच्या डब्यात पिवळी हळद देखील वापरली जाते. घरातील लहान मुलांना खरचटले, काही जखम झाली तर सगळ्यात आधी हळद लावली जाते. पिवळ्या हळदीचे अनेक उपयोग तुम्हाला माहित असतीलच. पण या सोबतच काळी हळद देखील बहुगुणी असते आणि अनेक आजारांवर प्रभावी उपाय ठरते हे तुम्हाला माहीत आहे का ??

बहुतेक जणांना हळदीचा हा प्रकार माहीत नसेल म्हणूनच आज तुमच्यासाठी काळ्या हळदी बद्दल थोडीशी माहिती:

काळी हळद खरंच काळी दिसते का?

काळी हळद लागवडीच्या परिस्थितीनुसार आकार आणि रंग बदलते. काळी हळद ही एक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीमध्ये सामान्यत: मुख्य भूमिगत राईझोम असते, ज्याला माता म्हणूनही ओळखले जाते. काळ्या हळदीच्या राइझोममध्ये अंडाकृती, निमुळते ते बोथट टोके असतात आणि पृष्ठभागावर अनेकदा चट्टे, मूळ केस, रिंग आणि नोड्स असतात. राइझोमची त्वचा गडद तपकिरी, टॅन, हलक्या बेज रंगाची असते.
काळ्या हळदीच्या राइझोमचे मांस दाट, तंतुमय आणि ओलसर, चघळणारे असते. या हळदीचा रंग गडद निळा, हलका निळा, कोबाल्ट निळा, निळा-हिरवा अशा छटांमध्ये दिसतो.

काळी हळद कुठे आढळते?

काळी हळद ही मूळची ईशान्य आणि मध्य भारतातील आहे आणि ती प्राचीन काळापासून जंगली भागात वाढत आहे. या वनस्पतीच्या प्रजाती उष्णकटिबंधीय, समशीतोष्ण प्रदेशात वाढतात आणि मुख्यतः जंगलांमध्ये भू-आच्छादन म्हणून आढळतात. काळी हळद सुरुवातीच्या काळात वन्य वनस्पतींमधून चारा काढण्यात आली आणि कालांतराने या वनस्पतींचा संपूर्ण भारतातील घरगुती बागांमध्ये औषधी वनस्पती म्हणून प्रचार केला गेला.

हेल्थ बेनिफिट:

मधुमेहाच्या रुग्णांसाठी काळी हळद जणू वरदान आहे. यामध्ये आढळणाऱ्या कर्क्यूमिन मध्ये दाहक-विरोधी गुणधर्म तसेच इन्सुलिन सुधारण्याची क्षमता असते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी सामान्य होते. काळ्या हळदी मुळे मधुमेह पूर्णपणे बरा होऊ शकतो.

काळी हळद मेंदूच्या आरोग्यासाठी विविध प्रकारचे फायदे देते. हे मेंदूतील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करू शकते. मायग्रेशनपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काळ्या हळदीचा वापर करू शकतात. काळ्या हळदीमध्ये कर्क्युमिन मध्ये नैराश्य कमी करणारे गुणधर्म असतात, त्यामुळे चिंता आणि ताण दूर होण्यास मदत होते.

काळ्या हळदीमध्ये फायबर पुरेसे असते. आहारात याचा समावेश केल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते. यामध्ये असलेले क्युरक्यूमिन हे अँटी-इंफ्लेमेटरी म्हणून काम करते. तसेच जळजळ कमी होण्यास मदत होते.

किरकोळ जखम, त्वचा सोलवटणे यासाठी अनेक प्रकारच्या क्रीम्सचा वापर केला जातो, पण जर तुम्हाला आयुर्वेदिक उपचार हवे असतील तर दुखापती झालेल्या भागावर काळ्या हळदीची पेस्ट लावा. असे केल्याने जखमा लवकर बरी होते.

जर तुम्ही उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर काळ्या हळदीचा आहारात नक्की समावेश करा. हे रक्तदाब सामान्य करण्यास मदत करते. यामध्ये असलेल्या कर्क्यूमिन मध्ये अँटिऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे रक्तप्रवाह निरोगी ठेवण्यास आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करतात.

तर अशी ही बहुगुणी काळी हळद आहारात वापरायला हरकत नाही.

-By Aparna Kulkarni
Back to blog

Leave a comment

Please note, comments need to be approved before they are published.